महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती
मुंबई – राज्यातील मराठी लेखक,दिग्दर्शक, निर्माते यांच्यासह चित्रपट क्षेत्राच्या विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्माण केलेला “कलासेतू” हे मराठी पोर्टल कलावंतासाठी हक्काचे व्यासपीठ ठरेल असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. आज मंत्रालयात त्यांच्या हस्ते कलासेतू पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनजय सावळकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे तसेच पोर्टल समितीचे सदस्य संदीप घुगे, केतन मारु आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.
kalasetu.art या नावाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे १२ ऑक्टोबरला प्रत्येक्षात हे पोर्टल कार्यान्वित होणार आहे. सुरुवातीचे तीन महिने पोर्टलवर नावनोंदणी विनामूल्य ठेवण्यात आली आहे. त्यानंतर सशुल्क दरात १ जानेवारी २०२५ पासून नावनोदणी करता येणार आहे.
“कलासेतू” पोर्टल हा सुरुवातीला विशेषतः चित्रपट कथा आणि पटकथा लेखकांसाठी कार्यान्वित करण्यात आला असून प्रथम त्यांनी नावनोदणी करणे अनिवार्य आहे. टप्याटप्याने या अनोख्या पोर्टलद्वारे गीतकार, संगीतकार, सकलक, छायालेखक, वेशभूषाकार, केशभूषाकार, निर्मिती प्रमुख, कला दिग्दर्शक अशा मनोरंजन क्षेत्रातील सर्व प्रकारच्या तंत्रज्ञ व कलावंतही नावनोदणी करू शकणार आहेत.
“कलासेतू” पोर्टल सृजनशील लेखक आणि नविन कल्पनांच्या शोधात असणारे कलासक्त निर्माते/संस्था तसेच इतरही घटकांसाठी सेतू म्हणून काम करेल तसेच चित्रपट उद्योगाच्या अखंड वाटचालीसाठी एक विश्वासार्ह, महत्वाचे व्यासपीठ म्हणूनही काम करणार आहे.