( गोपाळ पवार)
मुरबाड- सावळ्या विठू रायाची पंढरपुरची वारी ही वारकरी भक्तासाठी एक पर्वणी ठरते, ना कोणाचं आमंत्रण ना वारीला जाण्यासाठी कोणाचा आग्रह, उन्हाळा असो की पावसाळा त्या विठूरायाच्या भेटीसाठी लाखो अबालवृद्ध भाविक सालाबाद प्रमाणे आपली “वारी” करतात, मुरबाडची सुकन्या सौ ,”सुवर्णा” नावत जरी ‘सोनं” असलं तरी मातीशी कायम नाळजोडलेली , आयुष्यभर समाज सेवेचा वसा घेतलेल्या या पांडूरंगाच्या लेकिचा नियम काही चुकत नाही, कुंटूबाचा भार सांभाळताना परिस्थिती बेताची असताना देखील ठाकरे दाम्पत्य सौ, सुवर्णा ठाकरे आपला वसा जोपासतात, वयाने ४९ गाठताना आयुष्यातील केलेल्या लोकपयोगी,सेवा, महिलासाठी पाण्याचा प्रश्न सोडविण्या सारख्या समश्याव उपाय योजना रोजगाराची सोय अशा सेवे चे फळ म्हणजे १०० च्या वर अनेक पुरस्काराने संम्मानीत केली गेलेली हि पांडूरंगाची “लेक मात्र,,,, गेल्या २५ वर्ष झालं वारी चुकत नाही, पायीवारी सोबत डोक्यावर तुळस , पंढरपुर नगरीत येणा-या हजारो वारक-यांना प्रसादाचीसोय करण्याची परंपरा गेल्या पंचविशवर्षे ते आज पर्यत जोपासत आल्याने, तमाम वारी करणा-या वारक-यांत एक अपुलकीच नात निर्माण करून ठेवलं आहे, समाजमधील काही नी जरी उच्चशिक्षण घेतल असलं तरी त्या शिक्षणाचा फायदा गोरगरीबांना होण्या ऐवजी एक लूटारूपणा व “भामटे” गिरीत आनंद मिळणारी जमात उदयास येत असतांना ,दुस-या बाजूला मात्र “सुवर्णा “सारख्या माता भगिणी समाजसेवेचा, वारीचा वसा जोपासता पाहता,,,,,,,,
तुकाराम महाराजांच्या वाणीची आठवण येत की,,,,, शुद्धबिजा पोटी फळ रसाळ गोमटी,,तरीच जन्मा यावं दास विठोबाचं व्हाव !