आलिया भट्ट स्पाय युनिव्हर्समध्ये मोठा बदल घडवण्यासाठी सज्ज

0

मुंबई : भारतीय सिनेमातील दोन ताकदीच्या अभिनेत्री, आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी, २०२५ मध्ये “अल्फा” आणि “वॉर २” च्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सला नवा आयाम देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघींनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली असून, आता त्या या जगात सशक्त महिला भूमिकांना नवी परिभाषा देणार आहेत. “अल्फा” या चित्रपटात आलिया भट्टची भूमिका हे या युनिव्हर्ससाठी एक रोमांचक पाऊल ठरणार आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे ती जासूसी आणि अॅक्शनच्या नव्या जॉनरमध्ये स्वतःला पुन्हा सिद्ध करणार आहे. आलियाने नेहमीच आपल्या पात्रांमध्ये ताकद दाखवली आहे, ज्यामुळे तिच्या “अल्फा” मधील भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी यांच्यासारख्या दोन दमदार अभिनेत्रींच्या येण्याने स्पाय युनिव्हर्सचं आकर्षण आणखीनच वाढलं आहे, यात शंका नाही. त्यांच्या अभिनयातून या युनिव्हर्समध्ये नव्या गोष्टी अनुभवायला मिळतील, आणि २०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी स्पाय थ्रिलर्ससाठी नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे. कियारा आडवाणीचं या युनिव्हर्समध्ये येणं ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी कास्टिंग अनाऊंसमेंट आहे. कियारा या स्पाय अॅक्शन थ्रिलरमध्ये जबरदस्त स्टंट्स सीन्स मध्ये दिसणार आहे. याबाबत चाहत्यांमध्ये आधीपासूनच चर्चा होत आहे की कियाराची एनर्जी आणि अभिनयाची शैली “वॉर २” मधील तिच्या भूमिकेत प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech