अप्पीने रचला सुटकेचा कट; अमोलची शंका खरी ठरेल का ?

0

मुंबई : ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत कुटुंब अप्पीला अप्पी सारख्या दिसणाऱ्या दीपाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा आग्रह धरतो, पण अर्जुनने ते टाळतो. दरम्यान, अमोलच्या लक्षात आलंय की त्याच्या आईने त्याचं खास लॉकेट घातलेल नाही. स्वप्नील सर आणि दीप्या मामाला अमोल तिच्यासाठी नवीन लॉकेट बनवण्यास सांगतो. तो अप्पीकडे जेवण घेऊन जातो, पण जेवण्यापूर्वी दीपाला राजाचा संकेत मिळतो. ती ताबडतोब न जेवता निघून जाते. ज्यामुळे अमोलला धक्का बसतो कारण त्याची आई असं कधीच वागली नव्हती. बाहेर, राजा दीपाला GG च्या योजनेबद्दल सांगतो आणि जर तिने खोटी स्वाक्षरी केली तर त्यांना ₹१० लाख मिळतील असं सांगतो. पोलिस स्टेशनमध्ये, अर्जुन त्याचा घराच सीसीटीव्ही फुटेज पाहतोय, राजा आणि दीपा यांना मिळणाऱ्या पैशासाठी आनंद साजरा करताना पाहून त्याला धक्का बसतो. इकडे स्वप्नील आणि दीप्या अमोलला नवीन लॉकेट देतात. अमोल ते दीपाकडे घेऊन जातो, पण तिला त्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे ती काहीच प्रतिक्रिया देत नाही.

यामुळे अमोलच्या मनात शंका निर्माण झालेय. अर्जुनने अमोलचा गोंधळ लक्षात घेऊन त्याला स्पष्ट केलंय, की अपघातामुळे आईची स्मरणशक्ती कमी झाली आहे. तिला वेळ द्यायला हवा. अमोलचा अर्जुनवर विश्वास बसतो. एकीकडे, अर्जुन खऱ्या अप्पीचा शोधात आहे आणि दुसरीकडे, तो स्वतःच्याच कुटुंबाला फसवत आहे. दरम्यान, अप्पी जिला बंदिवासात ठेवले आहे, तिची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी आखलेल्या बनावट स्वाक्षऱ्यांचा समावेश असलेली एक भयंकर योजना ऐकते आणि तिकडून सुटकेचा प्रयत्न करतेय. खरी अप्पी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होईल? यासाठी बघायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ सोम- शनी संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech