‘अश्विनी चवरे’ने साडीतील फोटोशूटने दिली ब्रेकिंग न्यूज

0

मुंबई : अभिनेत्री अश्विनी चवरे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अश्विनीच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहते नेहमीच घायाळ होतात. सध्या अश्विनीची साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा रंगतेय. साऊथ चित्रपटांमध्ये अश्विनीने स्वत:च्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली आहे. खरंतर अश्विनी ही एक अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे पण स्वत:च्याच हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडींगमध्ये असते. या वर्षाच्या सुरुवातीलाच अश्विनीने एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधून अश्विनीने स्वतःचा असा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर सादर केला होता.

आता अश्विनीने पुन्हा एकदा एक नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये अश्विनीने पेपर साडी परिधान केल्याचं आपल्याला दिसत आहे. या पेपर साडीत ‘अश्विनी’चं सौंदर्य खुललेलं आपल्याला दिसत आहे. अश्विनीने हटके स्टाईलमध्येच हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधून अश्विनी एकप्रकारे आता ‘फॅशनवरती आलीय नवीन ब्रेकिंग न्यूज’ असचं काहीसं आपल्याला सुचवू पाहतेय. फार क्वचितच कलाकार अशाप्रकारची फॅशन करत असतात. पण अश्विनीच्या या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा रंगू लागलीय.

चालू २०२५ हे वर्ष अश्विनीच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण याच वर्षात अश्विनी ‘जिलबी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आली तर आता ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’,मी पाठीशी उभा या प्रसिद्ध मराठी सिनेमांत ती झळकणार आहे. याच वर्षी हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.तसेच अश्विनी चवरेने केलेल्या फोटोशूटमध्ये आत्मविश्वास, ग्लॅमरसपणा आणि बोल्ड व्यक्तिरेखा दिसत आहे. अश्विनीने केलेल्या या फोटोशूटमुळे तिच्या चाहत्यांना आता तिच्या आगामी प्रोजक्टची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अश्विनीच्या सोशल मीडियावर मित्रमैत्रिणींचे, चाहत्यांचे आणि नातेवाईकांचे अनेक कमेंट येताना दिसत आहेत. तसं बघायला गेलं तर अश्विनीचं कौतुक करण्यामध्ये इंटस्ट्रीमधील कलाकार देखील मागे राहिलेले नाहीत. त्यामुळे २०२५ वर्षअखेरीपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये अश्विनी सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री ठरेल यात काहीच शंका नाही. यामध्ये प्रमुख बाब म्हणजे अश्विनीचा हा नवा लूक तिला मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट आणि सेन्सेशनल चेहरा मिळवून देईल यात काहीच शंका नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech