अनेक फेस्टिवलमध्ये गाजलेला ‘फॉलोअर’ २१ मार्चला चित्रपटगृहात

0

मुंबई : आजवर अनेक फिल्म फेस्टिवल आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेला “फॉलोअर” हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर हे सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. मराठी, कन्नडा आणि हिंदी या तिन्ही भाषेचे मिश्रण आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तसेच बेळगाव, बंगलोर येथेही एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज. चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून मुख्य भूमिका ही त्यांनीच निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

अनेक दशकांपासून प्रादेशिक आणि भाषिक तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकतो. लक्षणीय मराठी भाषिक लोकसंख्या असलेले बेळगाव शहर दोन्ही राज्यांमधील वादाचा एक वादग्रस्त मुद्दा राहिले आहे.राजकीय आणि सामाजिक गतिशीलतेचा वेध घेणारी तीन मित्रांची एक रंजक कथा या चित्रपटात मांडण्यात आली असून ती कथा नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला २१ मार्चपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech