हनी सिंगची तरुण वर्गात मोठी क्रेझ; आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या भेटीस

0

मुंबई : रॅपर यो यो हनी सिंगची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आगामी प्रोजेक्टशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तो खूप चर्चेत राहिला.यातच आता त्याच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फेमस’ या डॉक्युमेंटरी फिल्मची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.या डॉक्युमेंटरीतून हनी सिंगच्या संघर्षाची कहाणी पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केले आहे. ऑस्कर पुरस्कारविजेत्या निर्माता गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसद्वारे ‘यो यो हनी सिंग : फेमस’ची निर्मिती करण्यात आली आहे. या फिल्मद्वारे भारतीय हिप-हॉप स्टार हनी सिंगचे जीवन आणि करिअर उलगडणार आहे. नुकतेच या डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हनी सिंगची ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही डॉक्यू-फिल्म २० डिसेंबर २०२४ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. एक सामान्य मुलगा ते एक लोकप्रिय रॅपर आणि त्यानंतर आलेलं आजारपण आणि मग केलेला जबरदस्त कमबॅक असा त्याचा संपुर्ण प्रवास डॉक्युमेंटरीमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यातून त्याचे अनेक सिक्रेट उलगडणार आहेत.

हनी सिंगवरील डॉक्यू-फिल्मचे दिग्दर्शक मोझेस सिंग म्हणाले, “हनी सिंगने या एका आयुष्यात इतके काही अनुभवले आहे, जे अनेक आयुष्यांतही क्वचितच घडतं. या चित्रपटामध्ये प्रेम, दु:ख, कुटुंब, यश, अपयश, मानसिक आरोग्य व प्रसिद्धी यांचा समावेश आहे. हा चित्रपट त्याच्या प्रवासाच्या अनेक टप्प्यांवर प्रकाश टाकतो आणि भारतीय हिप-हॉप संस्कृतीवर झालेल्या त्याच्या क्रांतिकारी प्रभावाचे दर्शन घडवतो.” तसेच या चित्रपटाबद्दल बोलताना हनी सिंगने यापूर्वी म्हटले होते, “मी माझ्या वैयक्तिक आणि करिअरमधील समस्या माध्यमांमध्ये मांडल्या आहेत; पण कधीच मनमोकळेपणानं सर्व काही सांगितलं नाही. माझ्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे आणि त्यांना माझी पूर्ण कथा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ही नेटफ्लिक्स डॉक्यू-फिल्म माझं जीवन, माझं बालपण आणि माझा सध्याचा संघर्ष यांचा प्रामाणिक आलेख मांडेल.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech