मुंबई : ‘झी मराठी’ वर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे. तर हा एक असा शो आहे जो बदलेल मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा, लवकरच तुमची लाडकी झी मराठी वाहिनी घेऊन येत आहे ‘चल भावा सिटीत’ हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे .
या स्पर्धकांना अश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील. चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर. चल भावा सिटीत शो बदलणार मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा. जसा प्रोमो गाजतोय तसं ह्या नव्याकोऱ्या शोचा सूत्रधार कोण असणार ह्याची सुद्धा उत्सुकता वाढताना दिसत आहे. तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा ‘चल भाव सिटीत’ लवकरच आपल्या झी मराठीवर येत आहे.