मुंबई : कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आहे. आता सानिका आणि सरकार स्पर्धेत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील आणि दोघांनाही ही शर्यत जिंकायचीच आहे. मात्र, सानिकाची आत्या साहेबरावांच्या या निर्णयाने नाराज आहे. सानिका आणि सरकार यांच्या प्रेमकहाणीला नव्या वळणावर नेणारे अनेक ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की, साहेबराव सानिकाला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास परवानगी देतात, ज्यामुळे सानिका आनंदी होते.
साहेबरावांच्या निर्णयामुळे खूपच धास्तावलेली आत्या आता काहीतरी कट रचू लागली आहे. ती सानिकाला या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी कोणते नवे डावपेच आखणार आहे? सानिकाला थांबवण्यात ती यशस्वी होईल का? की सानिका आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करणार? तसेच या स्पर्धेत सानिका आणि सरकारमध्ये कोण बाजी मारणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहात राहा ‘#लय आवडतेस तू मला’ दररोज रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर.