सचिन दरेकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या सिरीजमध्ये सई देवधर, तन्वी मुंडले, सागर देशमुख आणि चिन्मय मांडलेकरांसारखे कलाकार झळकणार आहेत…
भारताच्या सर्वात मोठा होम-ग्रोन व्हिडिओ स्ट्रिमिंग मंच तसेच विविध भाषीय स्टोरीटेलर ZEE5ने आपल्या आगामी ओरिजनल हिंदी ड्रामा सिरीज Maeriच्या ट्रेलरचा आज परिचय करुन दिला. सचिन दरेकर यांच्या झेनिथ पिक्चर्सची निर्मिती असलेला Maeri हा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा भावनिक थरारपट आहे. त्यामध्ये कुटुंबामधल्या गुंतागुंतीच्या नात्यांचा, तसेच अनेक गुप्त तथ्यांचा आणि व्यक्तीगत रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. Maeri मध्ये सई देवधर तारा देशपांडे नावाच्या धैर्यशील आईची भूमिका निभावत असून, सागर देशमुख यांनी त्यांच्या नवऱ्याची-हेमंत देशपांडेची भूमिका बजावली आहे, तन्वी मुंडलेने त्यांची साहसी मुलगी मनस्वी हिची भूमिका साकारली असून चिन्मय मांडलेकर आपल्याला कणखर एसीपी खांडेकर म्हणून पडद्यावर दिसतात. प्रेक्षकांना दिनांक 6 डिसेंबरपासून Maeri ZEE5 वर पहायला मिळेल.
Maeri तारा देशपांडे नावाच्या आईच्या कथेभोवती फिरते. सबळ तरुणांच्या समुहाद्वारे निघृणपणे आक्रमण झालेल्या आपल्या मुलीसाठी म्हणजेच मनस्वीसाठी ती कणखरपणे उभी राहते. न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळू न शकल्यामुळे तारा शक्तीशाली गुन्हेगारांविरुध्द मोर्चा बांधण्यासाठी घातक मार्गावरुन मार्गक्रमण करु लागते. सूड घेण्यासाठी ती प्रत्येक स्त्रोत वापरते आणि जमेल तो प्रयत्न करते. कथा जस-जशी पुढे सरकते तसे ताराला आपल्या कुटुंबातल्या अराजकतेचा आणि निर्दयी पोलिस अधिकाऱ्याचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे तिला आपल्या तात्विक मर्यादांना ओलांडावे लागते. प्रत्येक ट्विस्ट सोबत ताण वाढतो, अखेरीस शॉकिंग शेवट पहायला मिळतो. ताराच्या सूडाची तिला सर्वार्थाने किंमत मोजावी लागेल का?
तारा आणि हेमंत देशपांडे आपले गुंतागुंतीचे आयुष्य जगत असताना कथेमध्ये अनेक साशंक घटनांची शृंखला त्यांना त्यांच्या सर्वात भयानक भयांचा आणि विकल्पांचा सामना करायला भाग पाडते. प्रेक्षक Maeri ला हिंदीमध्ये डिसेंबर 6, 2024पासून केवळ ZEE5 वर पाहू शकतात.
निर्माता आणि दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाले, “ZEE5 सोबत काम करणे ही अतिशय आकर्षक संधी आहे, कारण इथे अनेक प्रेक्षकांसमोर आपले मत मांडता येत असल्याने, जागतिक स्तर गाठणे शक्य होते. “Maeri” ही एक सूड कथा असून ती रहस्य, मानवी नातेसंबंध, व्यक्तीगत वादासारख्या पैलूंना एकत्र गुंफत आई, वडील आणि मुलीमधल्या बंधावर लक्ष केंद्रित करते. यापैकी प्रत्येकजण त्याच्या स्वत:च्या तथ्यांसोबत संघर्ष करत आहे आणि आपण केलेल्या निवडीचे परिणाम भोगत आहे. Maeri केवळ सूडाबद्दल असलेली कथा नाही तर तिच्यामध्ये नितळ भावनांचा आंतर्भाव आहे ज्या नुकसान, प्रेम त्याचप्रमाणे गोष्टी तुमच्या विरुध्द गेल्यावर लढण्याचे समर्पण व्यक्त करतात. प्रेक्षक कथानकातले ट्विस्ट त्याचप्रमाणे त्यातील पात्रांच्या शक्तीशाली प्रवासाचा अनुभव करु शकतील याबद्दल मला अधिक उत्सुकता आहे.”
सई देवधर आपला अनुभव सांगताना म्हणाल्या, “तारा देशपांडे हे पात्र माझ्यामते अतिशय संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे. एका हृदयद्रावक प्रसंगामुळे तारामधल्या आईला आपल्या मर्यादा पार कराव्या लागतात, न्यायासाठी असलेला लढा तिच्यासाठी तिचे सामर्थ्य तसेच तिच्यावरचे ओझे बनतो. या सबळ कथानकाचा मी एक भाग असल्याचे आणि ताराच्या प्रवासाला सजीव करण्याचे मला अतिशय समाधान वाटते. प्रेक्षक आता हा शो पाहू शकतील, त्याच्यातल्या थरारक ट्विस्ट आणि सखोल भावनिक पदरांना ते समजून घेऊ शकतील. हे सर्व पाहण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. Maeri ही प्रत्येकाला साजेशी कथा आहे आणि ZEE5वर तिच्या रिलिजबद्दल मला अतिशय उत्कंठा वाटत आहे.”
मुलीची भूमिका साकारणारी तन्वी मुंडले म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यावेळी Maeriची कथा ऐकली, तेव्हा मी प्रचंड भारावून गेले होते. ही कथा अतिशय भावनाप्रधान आहे. मनस्वीचा प्रवास व्यक्तीगत प्रगतीचे उदाहरण आहे, जिथे ती क्षती आणि शोधासारख्या गुंतागुंतींच्या भावनांना सांभाळण्याची कला आत्मसात करताना दिसते. सई देवधर, सागर देशमुख यांच्यासारख्या चतुरस्त्र कलाकारांसोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून बरेचकाही शिकण्याची मला संधी मिळाली. ZEE5वर Maeri ची भावनिक सखोलता आणि थरार आता प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याची मला अतिशय उत्सुकता आहे.”