‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ आता ॲमेझॉन प्राइमवर

0

मुंबई : देवाचं घर म्हणजे काय ? ते नक्की कुठे असत ? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय रंजकपणे “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. ३१ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध झाला असून तिथेदेखील या चित्रपटाने अल्पावधीतच आपली उत्तम मोहोर उमटवून ट्रेंडीगवर आला आहे. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून मनाला भिडणारी गोष्ट दाखविण्यात आली आहे. एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं काय उत्तर असेल याचा शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. तसेच दरम्यान तिच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जोडही देण्यात आली आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ही गोष्ट उलगडणार असून सहकुटुंब हा चित्रपट पाहता येणारा असा हा चित्रपट आहे.

महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. मायराचा वायकुळचा अवखळ अंदाज सविता मालपेकर आणि उषा नाडकर्णी यांची खमंग फोडणी त्याला प्रथमेश परब, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, रेशम श्रीवर्धन यांची भक्कम साथ असल्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच मेजवानी मिळणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech