रितेश देशमुखांनी पत्नी जिनिलियासह लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला

0

लातूर : राजकारणाशी रितेश देशमुखचे जुने नाते आहे. रितेशचे वडील स्व. विलासराव देशमुख यांनी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. मात्र रितेश देशमुख हे कायम राजकारणापासून दोन हात दूर आहेत.रितेशची दोन्ही भाावंडे राजकारणात आहे. निवडणुकांच्या काळात कायमच ते राजकरणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण येते. राजकरणात येण्याच्या प्रश्नावर रितेश देशमुख म्हणाला, माझे दोन भाऊ असताना माझे राजकारणात काय काम आहे. रितेश देशमुखांनी पत्नी जिनिलियासह लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधाताना त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे . तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. रितेश देशमुख म्हणाला, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांना घराबाहेर जाऊन मतदानाचा हक्क बजवावा. मी फक्त आज मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो आहे. आज रात्री परत ट्रेन पकडून पुन्हा मुंबईला जाणार आहे. ऊन प्रचंड आहे. पण एक दिवस थोडा त्रास सहन आपण आपल्या देशासाठी सहन करु शकतो. प्रत्येकाला वाटते की एका मतदानाने काय फरक पडणार पण प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहेत. देशासाठी हा त्रास सहन करणे महत्त्वाचे आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech