बहुप्रतिक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
या चित्रपटाचे शो सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटाला देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवव्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.51 कोटींची कमाई केली आहे.
मोठ्या पडद्यावर सादर झालेल्या या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकरांची प्रमुख भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील रणदीप हुडाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचे कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 11.37 कोटींची कमाई केली आहे. नवव्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.51 कोटींची कमाई केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात १३.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरात 18.68 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीप हुड्डा यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. या चित्रपटात अंकिताने स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे.