मुंबई : ‘तुला जपणार आहे’ मालिकेने प्रेक्षकांसाठी एक वेगळं पण मनाला भावणारं कथानक टीव्हीवर आणलंय. मागच्या आठवड्यात तुम्हाला पात्राची ओळख झाली असेलच. पण येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मालिकेत काय पाहायला मिळेल याची थोडी कल्पना. तर अंबिकाला घरात प्रवेश आणि देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. देवीच्या कृपेने तिला शक्ती प्राप्त होते. जसा घराच्या दरवाजात बांधलेला पवित्र दोरा (दहन) जळतो, तशी अंबिका वेदाचे रक्षण करण्यासाठी घरात प्रवेश करते. वेदाचे प्राण वाचतात पण जे कोण ह्यात सामील आहेत त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय अंबिका करते. दरम्यान, मीरा आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी गावात मोठ्या सणाचे आयोजन करण्याचे वचन देते. ती कुंकवाचा कलश उचलून हा सण पूर्ण करण्याचा निर्धार करते. अंबिका घरात वेदाच्या जीवावर उठलेल्या लोकांना धडा शिकवत असतानाच, मायाला जाणवतं की पवित्र दोरा तुटला आहे. आणि नेमकं याच क्षणापासून मायाच्याही जीवाला धोका निर्माण झालाय. तर दुसरीकडे उत्सवाच्या विधी एक-एक करत पूर्ण करायचा मीराचा संघर्ष सुरु आहे. आता मीरा उत्सवाचे सगळे विधी पार करू शकेल ? अंबिका कश्या प्रकारे वेदाची रक्षा करेल? बघायला विसरू नका ‘तुला जपणार आहे’ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.