(अनंत नलावडे)
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली असली तरी महाविकास असो की महायुती या दोन्ही ठिकाणच्या विविध पक्षांतील नेत्यांपुढे एकाच घरात किती जणांना उमेदवारी द्यायची हा यक्षप्रश्न डोकेदुखी
ठरल्याचे व त्यामुळेच त्यांच्या त्यांच्या उमेदवारीच्या याद्यांना अद्याप मुहूर्त सापडत नसल्याची माहिती एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना उघड केली.
त्याने अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस,शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस,उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष असले तरी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत फक्तं आदेश चालत असल्याने उध्दव ठाकरे ज्यांना उमेदवारी देतील ते अंतिम. त्यामुळे तेथे हा प्रकार नसल्यात गणला जातो.मात्र उर्वरीत जे दोन प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणूकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने या दोन्ही पक्षातल्या मातब्बर नेत्यांनी स्वतःसह मुलगा,सून,पुतण्या यांना उमेदवारी देण्यासाठी आपापल्या नेत्यांवर दबाव आणत आहेत.काँग्रेस मध्ये तरं थेट दिल्लीच्या नेत्यांचेही उंबरठे झिजवायचे प्रकार तर वाढीस लागल्याने या पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी अक्षरशः हात टेकले आहेत.त्यातूनच पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याही डोक्याचा ताप वाढला आहे.
तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी उभी फूट पाडल्याने त्यांना आता नवखे उमेदवार उभे शोधावे लागत असून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांसह त्यांच्या कुटुंबातील मुला मुलींना, सूनांना आपल्या गळी लावून त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी देण्याचा सपाटाच लावला आहे.कारण आगामी विधानसभेत शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत आपले अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.याला कारणही त्यांना उमेदवारांचा मोठा तुटवडा जाणवत असला तरी खुद्द पवारांचीही डोकेदुखी वाढली आहे हे मात्र नक्की,अशी माहितीही या विष्लेशकाच्या बोलण्यातून उघड झाली.
आता राहता राहिला महायुती तरं यातील सर्वात मोठा पक्ष भाजपच्या डोकेदुखीत याच प्रश्नाने वादळ ऊभे केले आहे.याचे खरे कारण भाजपचे विद्यमान मातब्बर खासदार व माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या संदर्भातली. ते स्वतः खासदार, एक मुलगा निलेश राणे हा कणकवली विधानसभेतून विद्यमान आमदार.आता त्यांच्याच घरात राणे यांचा मोठा मुलगा माजी खासदार निलेश राणे यांनीही अलीकडेच आमदारकी लढवण्या बाबत सूचक वक्तव्याची.त्यावेळी आपण आता विधानसभा निवडणूक लढवणार च असे वक्तव्य केले होते. मात्र नेमके कोणत्या मतदार संघातून लढणार त्याची वाच्यता केली न्हवती.मात्र त्यांचा डोळा हा कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघावर असून येथून त्यांनी वर्षभरापूर्वीच आपली तयारी करण्यास सुरूवात केली आहे.परंतु प्रत्यक्षात हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे जागा वाटपात तो भाजपसाठी सुटेल की नाही हा खरा प्रश्न आहे. कारण अगोदरच लोकसभेला शिवसेना शिंदे गटाने आपल्या कोट्यातली जागा नारायण राणे यांच्यासाठी सोडली. त्यानंतर कुडाळ मालवणचीही जागा शिंदे राणेंसाठी सोडणार का ? यावर निलेश राणे यांचे भवितव्य अवलंबून आहे.
त्यामुळे उमेदवारी देण्यावरून भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचा दावा या विश्र्लेशकाने केला.असाच प्रकार भाजपतील काही वजनदार नेत्यांनाच्या बाबतींत घडत आहे.परंतू त्यांचे अंतिम उमेदवारी ही केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हेच ठरवत असल्याने जर उमेदवारी मिळाली नाही तर पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी वाढणार असे भाकीतही या विष्लेशकाने वर्तविले.
आता निष्ठावंतांनाच संधी……..
दरम्यान एकाच घरात उमेदवारी किती जणांना द्यायची हा प्रश्नही भाजप समोर असणार आहे.कारण घराणेशाही विरोधात नेहमीच भाजपमध्ये बोलले जाते.त्यातही २०१४ ते २०१९ या काळात पहिल्यांदाच भाजपचे आमदार मोठया संख्येने निवडून आल्याने मुख्यमंत्री पद भाजपकडे चालून आले. देवेंद्र फडणवीस यांनी सलग ५ वर्ष उत्तमरीत्या मुख्यमंत्रीपद भूषविले. तेंव्हापासून पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुस्कटदाबी कऱण्याची खरी लागण पक्षाला लागली. कारण त्यांच्या पदरी विधान परिषद तर सोडाच पण साध्या एखाद्या महामंडळाच्या सदस्य पदासाठीही त्यांना डावलण्यात आले. उदाहरणच घ्यायचे झाले तर माजी आमदार राज पुरोहित,अतुल शहा कोकणातून बाळ माने, विनय नातू, अशी बरीच देता येतील इतक्या नावाची यादी वाढत जाईल.मात्र मागील दोन वर्षात तर या घुसमटीचा स्फोट होतो की काय इतपत अंतर्गत नाराजी वाढीला लागली.मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालाचे पूर्ण सत्य अमित शहा यांना कळल्याने त्यांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.राज्यातील प्रमुख नेत्यांना आता निष्ठावंताची दखल घेण्याच्या सक्त आदेशच दिले असून महामंडळा वरील नियुक्त्या असो की राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या यात सक्तीने निष्ठावंतांना स्थान द्यायलाच हवेत असे स्पष्टपणे स्थानिक नेत्यांना बजावण्यात आले आहे. कारण भर विधानसभा निवडणुकीत निष्ठावंताची नाराजी लोकसभेसारखी भोवणार नाही व पुन्हा राज्यात भाजप आपल्या मित्रपक्ष सोबत राज्यात सत्तेत येईल असा चंगच अमित शहा यांनीही मनाशी बांधल्याने त्यांनीही येत्या निवडणूकीत जोमाने कामाला लागण्याचे दिसत आहे, असा गौप्यस्फोटही विष्लेशकाने शेवटी बोलताना केला.
………………….