सर्वाधिक लोक कल्याणकारी योजना राबवणारे लाडके मुख्यमंत्री..ना. एकनाथराव शिंदे

0

( प्राजक्त झावरे –  पाटील)

———————————-

२ दिवस गावी होतो..! या दरम्यान काही शेजारील गावांमध्ये – शेजारच्या तालुक्यात प्रवास झाला.. वेगवेगळ्या ठिकाणी- वेगवेगळ्या लोकांमध्ये.. वेगवेगळ्या aspects मध्ये..! जिथे महिला होत्या तिथे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची चर्चा जास्त होती…! जिथे नव्हत्या तिथेही कमी जास्त प्रमाणत ही तीच चर्चा..! “मुख्यमंत्री लाडकी बहीण”..!

त्याखालोखाल “ वयोश्री” , ST बस मधील अर्धे तिकीट, मुलींचे शिक्षण , तीर्थक्षेत्र योजना यांचीही चर्चा आहेच..! शेतीपंपाचे ( साडे सात एचपी च) बिल माफ आहे..! हे माहीत आहे शेतकऱ्यांना.. ते बोलत आहेत…!

काहीही म्हणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यकाळात जेवढ्या लोककल्याणकारी योजना आल्या आहेत; जेवढे उत्तम निर्णय झाले तेवढे कोणत्याच मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात झालेले नसावेत (with due respect for everyone)…! खऱ्या अर्थाने या लोककल्याणकारी राज्याचे मुख्यमंत्री “लोकनाथ” आहेत..!

तर “मुख्यमंत्री लाडकी बहीण” सर्वाधिक हिट आहे.. त्या संदर्भाने लोक बोलत आहेत; त्यातीलच आलेल्या या काही प्रतिक्रिया..!

( महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्रतिक्रिया सत्य असून त्यांचा थेट संबंध मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी आहे…! त्यातली भाषा फक्त माझी आहे “ थोडीशी प्रमाण मराठी वगैरे..”)

प्रातिनिधिक प्रतिक्रिया:

• “ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आणि लगेच २ महिन्यांचे पैसेही खात्यात आले देखील.”

• “ फक्त फॉर्मच नाही भरले बँकेचे खातेही मुख्यमंत्र्यांनी भरले.. विश्वास बसला..!”

• ⁠” आम्हा महिलांना कोणीच विचारात घेतले नव्हते; पण मुख्यमंत्री शिंदे यांनी आमचा विचार केला.”

• ⁠” हेच सरकार राहिले तरच लाडकी बहीण सुरू राहील..”

• ⁠” आता हेच शिंदेंच सरकार पुन्हा मत देवून निवडून आणू ; मग पाहू ५ वर्ष लाडकी बहीण सुरु राहते का?”

• ⁠” आमच्याच खात्यात पैसे आल्याने; आमची किंमत वाढवली.( आर्थिक किंमत या अर्थाने / सन्मान वाढविला अश्या अर्थाने )

• ⁠”माझा ७/८ दिवसांचा ‘कामाचा रोज’ मला माझ्या भावाने दिला.”

• ⁠” माझ्या संसाराचा भार ; माझ्या लाडक्या भावाने घेतला.”

• ⁠ “आज जेवायचे काय असा प्रश्न कधी कधी पडायचा पण मुख्यमंत्री शिंदे या लाडक्या भावाने दिलेल्या ओवाळणीमुळे तीही चिंता संपली..!”

• “ पैसे थेट आमच्या महिलांच्या खातात आल्याने ते वाया जाणार नाहीत; त्यांचा योग्य नि काटकसरीनेच वापर होईल.”

• ⁠लाडकी बहीण विरोधात कोर्टात गेलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण मधील मुख्यमंत्री शब्द काढून का असेना पटापट फॉर्म भरत आहेत.!

• ⁠ “ पुन्हा निवडून तर येतीलच शिंदे सरकार; आले की लगेच १५०० रुपये वाढवून २००० करतील..! “

• ⁠”यावेळी काहीही सांगा आमचे मत आमच्या भावालाच.. लाडक्या भावाला- शिंदे सरकारला..”

अश्या कित्येक बोलक्या प्रतिक्रिया मिळाल्या..! त्यातील ज्या लक्षात राहिल्या त्या ह्या..! तर या लाडक्या बहीण योजनेमुळे पूर्णत: मागे पडलेल्या विरोधातील लोकांची घाबरुन अनावश्यक गडबड सुरू आहे..! हे बाकीचे सगळे चालू राहील, हे खरच..! पण मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट ही नवीन concept लक्षात घेऊन ती दमदार पणे राबविली की मैदान मारलेच समजा..!

—– ———- 
———————————————————

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech