रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६६ हजार घरगुती गणपती

0

रत्नागिरी – येत्या शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) सुरू होणार असलेल्या यावर्षीच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ८६७ घरगुती गणपती प्रतिष्ठापित होणार आहेत. यावर्षी सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या ११२ असेल. जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय गणपतींची संख्या अशी – रत्नागिरी शहर – ७ हजार ९३६ घरगुती, सार्वजनिक २५, रत्नागिरी ग्रामीण – ११ हजार २१८ घरगुती, सार्वजनिक १, जयगड – घरगुती २७०८, सार्वजनिक ५, संगमेश्वर – १३ हजार ५४४ घरगुती, सार्वजनिक १, राजापूर – १९ हजार ९६६ घरगुती, सार्वजनिक ७, नाटे – ७ हजार २७९ घरगुती, सार्वजनिक ३, लांजा – १३ हजार ५४० घरगुती, सार्वजनिक ७, देवरूख – १२ हजार ४९३ घरगुती, सार्वजनिक ७, सावर्डे – १० हजार २४० घरगुती, सार्वजनिक १, चिपळूण – १६ हजार ७२५ घरगुती, सार्वजनिक १६, गुहागर – १४ हजार ४६० घरगुती, सार्वजनिक २. अलोरे – ५ हाजर ८५० घरगुती, सार्वजनिक ३, खेड – १३ हजार ७३६ घरगुती, सार्वजनिक २१, दापोली – ६ हजार ३३५ घरगुती, सार्वजनिक ९, मंडणगड – २ हजार ९९५ घरगुती, सार्वजनिक १०, बाणकोट – ६५३ घरगुती, सार्वजनिक २, पूर्णगड – ५ हजार ६९० घरगुती, सार्वजनिक १, दाभोळ -१ हजार ४९९ घरगुती, सार्वजनिक १०. गेल्या वर्षी घरगुती गणपतींची संख्या ११९ ने घटली आहे. सार्वजनिक गणपतींमध्ये सहाने वाढ झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech