नागपूर – वक्फ बोर्डला 10 कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र- गोवा राज्य मंत्री गोविंद शेंडे यांनी तीव्र निषेध केला. आज पर्यंत राज्यात तसेच देशातल्या विभिन्न भागात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा कधीही या समाजाने साधा निषेध सुद्धा केला नाही आणि पीफआय सारख्या देशविघातक संघटनांचा विरोध या समाजाने कधी केला नाही,पाकिस्थानला दहशतवादी गतीविधी करीता कधी ठणकावले का ? असा सवाल करीत काय अशी मजबुरी झाली की एवढ्या तातडीने शासनाने वक्फ बोर्डाला निधी मंजूर केला असा प्रश्न उपस्थित केला,एवढेच करून सरकार थांबले नसून 10 कोटी पैकी 2 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून पण दिला असल्याने महाराष्ट्रात वक्फ बोर्डवर बंदी आणण्या ऐवजी केवळ लांगुलचालन करण्याचे हे कृत्य असल्याचे शेंडे म्हणाले आहे.