मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील महाआरोग्य शिबीरात १० हजार पेक्षा नागरिकांनी घेतला सहभाग
मुंबई -मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेचे आरोग्य सुद्रुढ राहावे, यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शना खाली शिवे सेने तर्फे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत आयोजीत विनामुल्य महा आरोग्य शिबीरात वायकर यांनी अवयव दानाचा संकल्प करीत अर्ज भरला. या शिबीराचा सुमारे 10 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला.
दिवसेंदिवस वाढत जाणारी व न परवडणारी उपचार पद्धती, आर्थिक बाबीनमुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यावर परिणामकारक उपाययोजना तसेच रोगाचे निदान वेळीच व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खासदार वायकर दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. या शिबिरात विविध रोगांवर डॉक्टरांचे मार्गदर्शन, उपचार तर मिळातातच तसेच विनामुल्य औषधे देण्याचा प्रयत्न सातत्त्याने करण्यात येत आहे. शिबिराचे उदघाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात लोकसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवाना आवश्यक्यतेनुसार व्हीलचेअर, नेक बेल्ट, वॉकर, गुडघापट्टी, आधार काठी, मोफत औषधे व चष्मे यांचे वाटप करण्यात आले.. शिबिरात अस्थी रोग, बाल रोग, स्त्री रोग, दंत रोग, नाक-कान-घसा, मधुमेह, रक्त तपासणी, डोळे तपासणी, हाडांची ठीसुळता, त्वचा रोग, सर्वसाधारण रोग आदींची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यात आयुर्वेदिक व होमीयोपथीक उपचार पद्धतीचा ही शिबिरात समावेश करण्यात आला होता. या शिबीरात अवयव दानाचा स्टॉल उभारण्यात आला होता. खासदार रविंद्र वायकर यांनी हा फॉर्म भरून अवयव दानाचा केलेला संकल्प रोटो आणि सोटो च्या समनव्यक सुजाता अष्टेस्कर आणि पर्व संस्थेचे विश्वस्त प्रविण वराडकर यांच्या उपस्थितीत भरुन घेण्यात आला यावेळी बोलताना खा, वायकर म्हणले की बोलतो तेच प्रथम कृतीतून करून दाखवतो त्याच प्रमाणे आज अवयव दान संकल्प मी सुरू केला आहे आता संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात प्रचार आणि प्रसार करुन यासाठी अधिक जोमाने माझे कार्यकर्ते कामाला लागतील असा विश्वास दिला
या शिबिरात मुंबई महानगर पालिकच्या के. ई. एम, नायर, ट्रॉमा, कूपर रुग्णालयातील डॉक्टर, त्याचं बरोबर डॉ. रत्नपारखी, डॉ. राहुल महाले, डॉ. प्रवीण बांगर आदी डॉक्टर सहभागी झाले होते.
रोटरी क्लब, सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.