ठाणे – संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरिता महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्प लाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवांद्वारे बालकास मदत मिळवून देवू शकतात. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी श्रध्दा नारकर 9920172151 व अमोल वाघ 9689564693, यांची नेमणूक करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.