आंध्रप्रदेशात  रिऍक्टर स्फोटात 14 जणां मृत्यू, 50 जखमी

0

अनकापल्ली – आंध्रप्रदेशच्या अनकापल्ली येथील अच्युतापुरम सेझ येथील एसेन्सिया कंपनीत आज, बुधवारी रिऍक्टरमध्ये स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना अनकापल्ली एनटीआर हॉस्पिटल आणि स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यासंदर्भातील माहितीनुसार आज, दुपारी कारखान्याच्या रिॲक्टरमध्ये अचानक झालेल्या स्फोटात आतापर्यत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनकापल्लीच्या पोलिस अधिकारी दीपिका यांनी सांगितले की, अच्युतापुरम सेझमधील कंपनीत रिॲक्टर स्फोटाच्या घटनेत 50 ते 60 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतपर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील २०२३ मध्ये, अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथे असलेल्या फार्मा कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech