ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवा आणि ठाण्यातील ४४८३ गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीच्या रुपाने सुरक्षा कवच दिलेले आहे. ही पॉलिसी देताना गोविंदा पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की, सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या, कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करुया. इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण सहकार्य करेल. दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास सर्व गोष्टी ओरिएंटल इन्शुरन्सने कव्हर केलेल्या आहेत. माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व मी अशा आम्ही दोघांनी मिळून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओरिएंटल इन्शुरन्सची ही विमा पॉलिसी राबविली जात आहे.
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील ४४८३ गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसिचे सुरक्षा कवच दिले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. दहिहंडी असोसिएशन, महाराष्ट्र राज्यचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलीसीचे वाटप, करताना व्यक्त केली.
ठाणे तसेच कळवा परिसरातील ४४८३ गोविंदांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, विवियाना मॉल समोर, ठाणे येथे ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॅलिसिचे वाटप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गोविंदा पथकातील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा पॉलिसी काढून दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी ‘दहिहंडी उत्सवाचा विजय असो’, ‘बोल बजरंग बली की जय’ आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी दहिहंडी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर पेंढारे, असोसिएशनचे सदस्य दिगंबर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव आदी मान्यवर उपस्थित होते.