कोकण रेल्वेवर ३१ मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक

0

मुंबई – कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते वैभवाडी रोड स्थानकादरम्यान ३१ मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी सकाळी ९.१० ते ११.४० या वेळेत कोकण रेल्वेने हा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकाची प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी ३१ मे रोजी रत्नागिरी ते वैभवाडी रोड स्थानकादरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस (१०१०६) या गाडीचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड – वैभववाडी रोड स्थानकादरम्यान ८० मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास चिपळूण – रत्नागिरी स्थानकादरम्यान ४० मिनिटांसाठी स्थगित केला जाणार आहे. तसेच मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech