महानैवेद्य योजनेत सहभागी होता येणार
सोलापूर : आषाढी-कार्तिकी भक्तगण येती… म्हणत पंढरीच्या पांडरायाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे, आषाढीच्या वारीनंतर भाविकांना उत्सुकता असते ती कार्तिकी एकादशीची. कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना अखंड देवाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी देवाचा पलंग निघाला आहे. आता देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. आषाढी व कार्तिकी या दोन यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भावी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी उद्यापासून देव 24 तास दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे.