डल-झीलमध्ये उभारणार 3 तरंगती मतदान केंद्रे

0

जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द झाल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणुकीचे बिबुल वाजले आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत एकही मतदार डावलला जाणार नाही यासाठी निवडणूक आयोग कबंर कसली आहे, निवडणुका शांततेत आणि मतदारांसाठी निर्भय मतदान सुव्यवस्थित पार पडावी यासाठी नुकताच काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणुक आयुक्तांच्या देखरेखीत विशेष पथकाने जम्मू-काश्मीर दौरा केला होता. सुरक्षा तसेच परिस्थिचा आढावा घेताच. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली. नागरीकांच्या सोयीनुसार निवडणूक आयोगाने डल-झील (तलावात) 3 तरंगणारी मतदान केंद्रे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, नियंत्रण रेषेवर एक मतदान केंद्रही उभारण्यात येणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावेळी बोलतांना सांगितले की, ही अद्वितीय मतदान केंद्रे उभारण्याचा उद्देश दुर्गम भागांशी संपर्क सुनिश्चित करणे हा आहे. दल सरोवरात बांधलेल्या 3 तरंगत्या मतदान केंद्रांवर पोलिंग पार्टीला बोटी आणि बोटींनी मतदारांना पोहचविले जाणार आहे. यावेळी कुमार म्हणाले की, तीन मतदान केंद्रांपैकी एका केंद्र ‘खार मोहल्ला आबी कर्पोरा’मध्ये फक्त 3 मतदार आहेत. गुरेझ विधानसभा मतदारसंघातील कोरागबल मतदान केंद्र भारतीय आणि पाकिस्तानी क्षेत्रांमधील नियंत्रण रेषेवर आहे.

राजीव कुमार म्हणाले की, ‘ एलओसीवर बांधले जाणारे मतदान केंद्र केवळ 100 टक्के अनुसूचित जमाती (एसटी) लोकसंख्येसाठी आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदान केंद्रावर 80.01 टक्के मतदान झाले होते. सीमारी हे कुपवाडा जिल्ह्यातील पहिले मतदान केंद्र आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी सांगितले होते की रसद आणि सुरक्षा आव्हाने असूनही, मतदानाची टक्केवारी सातत्याने उच्च आहे. ही खरोखरच उत्साहवर्धक बाब आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दशकभरानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. आगामी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यांत येथे मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. येथे विधानसभेच्या 90 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला 24 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर रोजी 26 जागांसाठी आणि 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात 40 जागांसाठी मतदान होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech