जम्मू – जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील कठुआ येथे आज, बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत 3 जिहादी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षा दलांकडून अजूनही दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर निवडणुकीपूर्वी खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेवर लष्कराच्या पथकाने 3 खात्मा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांचे संयुक्त पथक खांद्रा टॉपच्या दिशेने गेले तेव्हा ही चकमक झाली. या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी रात्री 1 वाजेच्या सुमारास शोध पथकावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. गोळीबार सुरु होताच अतिरिक्त फौजा वनक्षेत्रात पाठवण्यात आल्या होत्या. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. ज्या अंतर्गत सुरक्षा दलांनी कठुआ येथे चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार केले. ही कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 1 पॅरा, 22 गढवाल रायफल्स आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांचा समावेश आहे.