कोरोनाचा पुन्हा भारतात शिरकाव नव्या विषाणूचे देशात ३२४ रुग्ण

0

नवी दिल्ली – भारतासह जगभरात २ वर्षे हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या केपी १ व केपी २ या नव्या विषाणूने सिंगापूरपाठोपाठ भारतातही शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारताच्या वेगवेगळ्या राज्यांत केपी १ चे ३४ तर केपी २ चे २९० रुग्ण सापडले आहेत. हा कोरोनाच्या जेएन-१ चा उपव्हेरिएंट आहे

कोरोनावर नजर ठेवणाऱ्या इंडियन सार्स कोव-२ जिनोमिक्स कंसोर्टियमच्या डेटामधून भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे उघडकीस आले आहे.भारतातील ७ राज्यांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक २३ रुग्णांची ओळख पटली आहे, तर गोव्यात १, गुजरात मध्ये २, हरयाणात १, महारष्ट्रात ४, राजस्थानात २, उत्तराखंड मध्ये १, केपी १ चे रुग्ण आढळले आहेत. तर केपी-२ रुग्णांची संख्या २९० वर पोहचली आहे.ज्यात सर्वाधिक १४८ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये ३६ , गुजरातमध्ये २३ , राजस्थानमध्ये २१ , उत्तराखंडमध्ये १६ , गोव्यात १२, ओरिसात १७ , उत्तर प्रदेशात ८ , कर्नाटकमध्ये ४, हरयाणात ३ व दिल्लीत १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. कारण सिंगापूरमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटने हाहाकार माजवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech