दादासाहेब फाळके चित्रनगरीत ५० वृक्षांची लागवड

0

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वच्छ व हरित शाश्वत चित्रनगरी सप्ताह साजरा केला जात आहे. याच पार्श्वूमीवर महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी अनोख्या पद्धतीत वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला आहे. चित्रनगरीत ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान शाश्वत व हरित चित्रनगरी उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चित्रनगरीला अधिक हरित बनवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आपल्या वाढदिवशी वृक्षारोपण करुन पर्यावरण स्नेही वाढदिवस साजरा केला.

यावेळी डॉ. सावळकर म्हणाले, “महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे या उपक्रमाला जोडूनच आज मी वाढदिवसानिमित्त आपली गोरेगावची चित्रनगरी आणखी हरित करण्याच्या दृष्टीने ५० बहावा या कोकणातल्या वृक्षाची ज्याला सुंदर अशी सोनेरी रंगाची फुले येतात, अशा रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या चित्रनगरीतील सर्व सहकाऱ्यांचेही आभार”. स्टुडिओ नंबर दोनच्या समोर ही रोप लावण्यात आली असून यावेळी चित्रनगरीतील अधिकारी- कर्मचारी यांनीही वृक्षारोपण केलं. दरम्यान डॉ. सावळकर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech