ठाणे पूर्व भागात ५४ सीसीटीव्हींमुळे महिला-नागरिकांना हक्काची सुरक्षा

0

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाड्यापासून कोपरी गावापर्यंत ५४ सीसीटीव्हींचे जाळे उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या सीसीटीव्हींमुळे कोपरी परिसरातील महिला व सामान्य नागरिकांना हक्काची सुरक्षा मिळणार असून, चोरट्यांना आवर बसेल. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकारामुळे या कामाला मंजुरी मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पूर्व भागात भुरट्या चोऱ्या, सोनसाखळी चोरी आणि वाहने चोरीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता. या निधीसाठी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही सहकार्य केले. या प्रयत्नांमुळे कोपरी पोलिस ठाणे अंतर्गत ५४ सीसीटीव्ही मंजूर करण्यात आले. भरत चव्हाण यांच्या सूचनेनुनार या भागातील गजबजलेल्या व आवश्यक ठिकाणांचा सीसीटीव्हीत समावेश केला आहे.

चेंदणी कोळीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात आज सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या तीन महिन्यांत चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, कोपरी गावापर्यंतच्या परिसरासह संपूर्ण ठाणे पूर्व भागात सीसीटीव्ही बसविले जातील. त्यानंतर कोपरी पोलिसांकडून कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयित व्यक्तींवर नजर ठेवून त्यांना ताब्यात घेतले जाईल. त्यामुळे ठाणे पूर्वमधील सामान्य नागरिकांसह, महिला, मुले, तरुणींना सुरक्षेचे जाळे उपलब्ध होणार आहे. या कार्याबद्दल कोपरीतील नागरिकांच्या वतीने माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचे आभार मानण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech