एअर कस्टम व एअर इंटेलिजन्सची संयुक्त कारवाई
नागपूर – एअर कस्टम्स यूनिट आणि एअर इंटेलिजन्स युनिटच्या संयुक्त कारवाईत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 24 किलो सोने पकडण्यात आले. या सोन्याची किंमत 61 लाख 25 हजार 549 रुपये आहे.
एअर इंटेलिजन्स यूनिटच्या टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत प्रवाशाची तपासणी केली असता 2 ट्रॉली बॅगमध्ये चांदीच्या रंगाच्या जाड तारांच्या स्वरूपात सोने लपवून ठेवलेले आढळून आले. वायरच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला चांदीचा लेप दिला होता. यामुळे नियमित बॅगेज स्क्रीनिंग मशीनवर सहज शोधता येत नाही.या ऑपरेशनमध्ये, 384.100 ग्रॅम आणि 475.230 ग्रॅम असे एकूण 24 किलो सोने पकडण्यात आले. या सोन्याची एकूण किंमत 61 लाख 25 हजार 549 रूपये इतकी आहे. कतार एअरवेजने (फ्लाइट क्र. क्यूआर-590) दोहाहून नागपूरला जात असलेल्या दोन प्रवाशांकडून सोने जप्त केले आहे.