अमरावती कारागृहात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ

0

अमरावती – अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पैकी एका बॉम्ब सदृश बॉलचा स्फोट झाला कारागृह प्रशासनाकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आपल्या ताफ्यासह कारागृहात पोहचले. तर रात्री कारागृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने काहीतरी मोठी घटना घडली असल्याची चर्चा झाल्याने एकच खळबळ उडाली.

ही घटना समोर आल्यानंतर अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातील बॉम्बशोधक व नाशक पथकालादेखील पाचरण करण्यात आले. यावेळी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. या पाहणीत ज्याप्रमाणे चेंडूमध्ये गांजा आढळला होता. अगदी त्याचप्रमाणे प्लास्टिक चेंडूच्या आकाराची बॉम्बसदृश वस्तू कारागृहात आढळून आली. दरम्यान कारागृहामध्ये प्लॅस्टिकच्या चेंडूमध्ये दोन फटाके सदृश्य वस्तू फेकण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. पैकी एक फटाका फुटल्याची माहिती त्यांनी उशिरा रात्री दिली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने त्यात दोन प्लास्टिकच्या चेंडूमध्ये फटाके असल्याचे स्पष्ट केले आहे.

उशिरा रात्रीपर्यंत कारागृहातील अंतर्गत तपासणी सुरू होती. कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉलमधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन बॅरॅकच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश असल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त, नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech