जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते – पंतप्रधान

0

नवी दिल्ली : भारताच्या सागरी प्रवासाच्या प्राचीन क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही देशात सुरू आहे. या अनुषंगाने लोथलमध्ये एक मोठे संग्रहालय देखील बनवले जात आहे, जर तुमच्याकडे कोणतेही हस्तलिखित, कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज, कोणत्याही हस्तलिखिताची प्रत असेल तर तुम्ही ती भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीने जतन करू शकता, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ (116 वा भाग) कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पतंप्रधान म्हणाले. जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मी परवा रात्रीच दक्षिण अमेरिकेतील गयाना या देशातून परतलो आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर, गयानामध्येही एक ‘मिनी भारत’ वसला आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी गयानात, भारतातील लोकांना शेतात काम करण्यासाठी आणि इतर कामांसाठी नेण्यात आले होते. आज गयानामधील भारतीय वंशाचे लोक, राजकारण, व्यवसाय, शिक्षण आणि संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात गयानाचे नेतृत्व करत आहेत. गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली हे देखील भारतीय वंशाचे आहेत, ज्यांना आपल्या भारतीय वारशाचा अभिमान आहे. मी गयानामध्ये असताना माझ्या मनात एक विचार आला – जो मी तुम्हाला ‘मन की बात’ मध्ये सांगत आहे. गयानाप्रमाणेच जगातील डझनभर देशांमध्ये लाखो भारतीय आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले, विदेश दौऱ्यादरम्यान मला स्लोव्हाकियामध्ये होत असलेल्या अशाच आणखी एका प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. जो आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याशी संबंधित आहे. इथे प्रथमच, आपल्या उपनिषदांचा स्लोव्हाक भाषेत अनुवाद झाला आहे. या प्रयत्नांतून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.

काही दशकांपूर्वीच्या, 200-300 वर्षांपूर्वीच्या… त्यांच्या पूर्वजांच्या… स्वतःच्या अशा कथा आहेत. भारतीय स्थलांतरितांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा कसा उमटवला याच्या कथा तुम्हाला सापडतील का! तिथल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी कसा भाग घेतला! त्यांनी आपला भारतीय वारसा कसा जिवंत ठेवला? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अशा सत्य कथा शोधाव्यात आणि त्या मला सांगाव्यात. तुम्ही या कथा नमो अॅपवर किंवा MyGov वर, #IndianDiasporaStories या हॅशटॅग वर देखील शेअर करू शकता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech