त्र्यंबकेश्वर : त्रंबकेश्वरी आज महाशिवरात्र पर्वकाळ यात्रेकरू भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आज श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मोफत दर्शन सुविधा पाहटे पासून अहोरात्र सुरू ठेवली आहे. देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजाचा मुख्य मंडप भरून तसेच जादाचा मुख्य मंडप भरून देखील भाविकांची रांग गोरक्षनाथ आखाड्यापासून ही पंचायती जुना बडा उदासी आखाडापर्यंत पोहोचली आहे. त्रंबकेश्वर मंदिर मुख्य चौक तसेच पूर्व दरवाजा परिसर अहिल्या गोदा संगम घाट व प्राचीन जुने महादेव मंदिर परिसर या सर्व परिसरात तसेच ज्यादा चा मंडप या ठिकाणी भर उन्हात भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. रांगेतील भाविकांना चार ते पाच तास दर्शनासाठी उभे राहावे लागत आहे. शेवटच्या एक तासात भाविकांना मुख्य मंडपामध्ये वातानुकलीत हवेशिर वातावरण तसेच पाणी बॉटल प्रसाद या सुविधा दिल्या एक त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून दिल्या जात आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागून स्मशान भूमी रोडच्या बाजूने अशा पद्धतीची रांग वळवण्यात आली आहे. मुख्य मंडप वगळता भाविकांना उन्हाचा अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. मधील सर्व परिसराला भाविकांचा वेढा पाडल्याची स्थिती आहे भावीक हर हर महादेवचा गजर करून देवाच्या दर्शनासाठी पुढे सरकत आहे. आता ही परिस्थितीआहे त्रनकुंभमेळ्यात काय होणार अशी चर्चा देखील वरील परिसरात नगरीत सुरू आहे. पाऊण लाखाचे वर भाविक येथे गर्दी करून आहे. विशेष म्हणजे बाह्य रांगांकडे देखील विविध यंत्रणांनी लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. कुशावर्त तीर्थावर देखील भाविक स्नान आणि वंदन करून गोदावरी दर्शन घेत आहे..आज पहाटे त्रंबकेश्वर मधील साधू महंतांनी स्वाध्याय मिरवणूक काढित कुशावर्तावर गोदावरी स्नान केले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. साधू महंतांच्या दर्शनानंतर भाविकांक्या दर्शनाला प्रारंभ झाला.