आदीम बांधवांना उपजिविकेचे ठोस साधन उपलब्ध नसताना गौरी गणपती उत्सव ठरतोय उपजिविकेचा साधन…!
मुरबाड – गोपाल पवार
ठाणे जिल्हयातील आदिवासी भाग हा पूर्वीपासून डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला असल्याने ह्या आदिम बांधवांनी निसर्गाबद्दल मोठी श्रद्धा जपलेली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातील प्रत्येक घटकाची छाप आदिवासींच्या जीवनावर पडलेली दिसते. निसर्ग नियमावर आधारित जीवनाची गुजरान करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनस्पती सृष्टी बरोबरच जंगलातील इतर जीवनमूल्यांचे अधिक दान लाभले आहे. ठाणे जिल्हातील मुरबाड-शहापुर हे डोंगराळभाग बहूल तालुके आहेत तर कल्याण अंबरनाथ हे तालुके जंगलमयपट्टयात येत असल्याने या जंगलात मिळणाऱ्या वनस्पती साहित्य जंगलातुन गोळा करून भाविकांच्या घरापर्यत पोहचविण्याचे काम अदिवासी महिला करतात. गणपती गौरी सणात माळशेज घाट लगतच्या वाड्या पाड्यावरील महिलांना या साहित्य विक्रीतुन रोजगार ही उपलब्ध होतो.
राज्यात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची प्रतिष्ठापनासह गौरी गणपतींचे आवाहन करण्यात येत असतांना या सणासुद्धीच्या काळात लागणारी पुजा सामुग्री गोळा करून आणण्यात आदिम बांधवाचा मोठा सहभाग असतो. रानावनात मिळणाऱ्या साहित्यांतून पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी आदीम बांधव राणावनातील पुजेसाठी लागणारी साहित्य गोळा करतात. गौरी गणपतीच्या या सणाच्या दिवसात पुजेसाठी लागणार साहित्य पळसाची पाने, केळीची पाने, कुड्याची शेंदुळीची, हळदीची पान, तिळाची फुल, दिंडा असं सर्व प्रकारची नैसर्गिक पुजा साहित्याची आवश्यकता मोठया प्रमाणात भासते परंतु शहरी भागात हे साहित्य मिळत नाही मात्र, आदीम बांधवांकडून हे साहित्य शहरी भागात आता सहज उपलब्ध होत असल्याने डोंगराळ ग्रामिण भागातील अदिवासी पाड्यावरील महिलावर्ग जंगलात उगवणारी पानं फुल वेली शोधून आणतात.
गणेशोत्वात गौरी उत्सवात हे साहित्य भक्ताच्या घरापर्यत पोहचविण्याचे काम करणाऱ्या महिलां भक्ताना एक प्रकारे आनंद देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे ग्रामिण भागात मातीच्या घड्याला रंगकाम करून त्याचे “सुगड” बनवितात व त्या घड्यात जंगलातील दुर्मिळ वनस्पती म्हणून ओळख असलेली “अग्नीशिखा” या वनस्पतीला ग्रामिण भागात ‘कलई’ म्हणतात ह्या अग्नीशिखाच्या च्या एका फुलात अनेक कलर सामावलेले असतात त्या सोबत दिड्याची पान जंगली हळदीची पान असे पाच प्रकरच्या वनस्पती एका पळसाच्या पानात गुंडाळून गौराई”म्हणून विकली जाते व हि गौराई मातीच्या घड्यात भरून घरातीळ चुली जवळ पुजन करून स्थापन केली जाते. जंगलातील हे साहित्य अग्नीशिखा सह नैसर्गिक पुजा साहित्य शोधण्यासाठी अदिवासी कुंटूबातील जाणकार नागरिक चार दिवस अगोदर जंगलधुंडाळून त्या नंतर या वनस्पतीच्या पाती फुल वेल पानं तोडून त्यांची जुडी करतात व टोपलीत किंवा दुरडीत ठेवून आठवडी बाजारात शहरी भागात ६० रू ते १२० रू भावाने महिला वर्ग विक्री करतात मेहनतीच्या मानाने हि तुंटपुंजा रक्कम असली तरी पावसाळ्याच्या व सणासुदिच्या दिवसात निसर्ग मात्र उपजिविकेच साधन उपलब्ध करून देते !!
स्वत:च्या घरात हा सण साजरा होत नसला तरी पावसाळ्यात उपजिविकेचे ठोस साधन उपलब्ध नसताना गौरी गणपती उत्सव हा त्यासाठी महत्वाचा सण असतो नैसर्गिक साहित्यातुन त्यांची चुल पेटण्यास व गोडधोंडाची दोन घासाची सोय . होते निसर्गावर कुंटूबाची मदार असल्याने हाताला काम देणाऱ्या सरकारी योजना घोषित केल्या जातात. एका प्रकारे या योजनाचा पाऊस पडतो तो देखील कागदावरचं पुर्ण होतात. शासकिय रोज ‘गार’ पडले असल्याने अदिवासी कुंटूबांपर्यत पोहचत नसल्याने पावसाळ्यात उदरनिर्वाहसाठी केवळ आणी केवळ निसर्गावरच धाऊन येतो, निसर्गातील मुबलक मिळणारे साहित्य विक्रीतुन मिळणारे उत्पन्न वाढत्या महागाई मुळे हे पैसे घर खर्चामध्ये कुठल्या कुठे निघून जातात हेच कळत नाहित मात्र सण उत्सव पावसाळ्यात चणचण भासवू देत नाहीत हेही मात्र, तेवढेच खरे.