राजकोट मध्ये शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार – दीपक केसरकर

0

एकूण १०० कोटींचा प्रकल्प ; ओरोसमध्ये प्रकल्पाचे केले सादरीकरण

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मालवण-राजकोट येथे शिव छत्रपतींचा संपूर्णपणे ब्रॉन्झचा पुतळा उभारणार येणार आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूच्या आरक्षित जागेवर शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ओरोस येथे ते आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी मंत्री केसरकर पुढे म्हणाले, पुतळा आणि शिवसृष्टी या प्रकल्पासाठी एकूण १०० कोटी खर्च येणार आहे. पुतळ्यासाठी २० कोटी तर शिवसृष्टीसाठी ८० कोटी खर्च प्रस्तावित आहे. पुतळा सहा महिन्यात तर शिवसृष्टीचे काम एका वर्षात पूर्ण होईल यावेळी या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यातआले. या शिवसृष्टीमध्ये मत्स्यालय, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय असणार आहे. तसेच राजकोट वरून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेटी देखील उभारण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितलं. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे तसेच अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech