एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला

0

काठमांडू – नेपाळच्या गिर्यारोहक फुंजो झांगमु लामाने अवघ्या १४ तास ३१ मिनिटांच्या कालावधीत एका महिलेद्वारे एव्हरेस्टच्या जगातील सर्वात वेगवान चढाईचा विक्रम नोंदविला आहे. फुंजो लामा यांनी ही कामगिरी करून स्वत:चाच विक्रम मोडला आहे. याआधी यापूर्वी फुंजो लामा यांनी २०१८ मध्ये ३९ तास ६ मिनिटांत गिर्यारोहण पूर्ण केले होते.

नेपाळी वंशाच्या महिला गिर्यारोहकाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या महिला गिर्यारोहकाने १५ तासांपेक्षा कमी कालावधीत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या फुंजो लामा यांनी गुरुवारी सकाळी ६.३ वाजता ८,८४८ मीटरची चढाई केली. त्यांनी ८,८४८.८६ मीटर (२९.०३१ फूट) एव्हरेस्ट डोंगरावर स्केंिलग केले. हिमालयातील शिखराला सर करण्याचा तिचा हा तिसरा प्रयत्न होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech