ठाणे : आधारवड जेष्ठ नागरिक केंद्रातर्फे ठाण्यात बुधवारी १९ तारखेला शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले गेले होते. रुपेश पवार यांचे वडील बी. के. पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन केल्यावर सोहळ्याला प्रारंभ झाला. या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून एडवोकेट रुपेश पवार यांनी शिवचरित्रावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. त्यांचा विषय ‘छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून’ असा होता. यावेळी कवी साहित्यिक श्री जयंत भावे यांनी सुरुवातीला पहाडी आवाजात पोवाडा गाऊन रसिक मनाचे स्फूर्तीपूर्वक मनोरंजन केले. साहित्यिक, इतिहास प्रबोधक रुपेश पवार यांनी आपल्या व्यख्यानातून शिवचरित्राच्या नाट्यमय गोष्टी मांडताना शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ रसिकांसमोर उलगडला. १० व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत भारतात त्यावेळी काय काय घडले हे त्यांनी थोडक्यात सांगून शिवचरित्राला हात घातला. अतिशय विचारपूर्वक, चैतन्यमय नंम्र शब्दात शिवचरित्रातील सर्व घटनांचा मागवा घेत. रुपेश पवार यांनी शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी स्वराज्याची एक वेगळी माहिती रसिकांसमोर ठेवत सुंदर सुसंवाद साधला.
आधारवड.संस्थेचे सल्लागार मा. प्रा. डाॅ. श्रीकांत होटे सर यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्था करीत असलेल्या सामाजिक प्रबोधनात्मक कार्याची माहिती दिली, छत्रपती शिवरायांचे गुणात्मक सामाजिक कार्य आणि साहित्यिक श्री. रुपेश पवार यांचा सुंदर शब्दात परिचय करून दिला. त्यानंतर सुप्रसिद्ध कवी जयंत ना. भावे यांनी छत्रपतींचे अलौकिक गुणवर्णन करणारा ‘ जाणता राजा शिव छत्रपती ‘ हा स्वरचित पोवाडा शाहिरी बाजात आवेश व जोशपूर्णरित्या सादर केला व रसिक श्रोत्यांची भरभरून दाद मिळविली .प्रसिद्ध करा॓ ओके गायक श्री. अशोक रुईकर यांनी सुरेल आवाजात ‘ वेडात दौडले वीर सात ‘ हे गीतही प्रभावीपणे सादर केले व वाहवा मिळवली. जेष्ठ कवी श्री.बी. जे. देशपांडे यांनी ‘शिवछत्रपती अमर झाले ‘ही कविता तसेच जेष्ठ कवयित्री जया राव यांची कविता ह्या दोहोंनीही सादर केलेल्या चरित्रात्मक कविता अतिशय प्रभावीपणे व परिणामकारकतेने सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली . संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भालचंद्र रोडे यांनी श्री. रूपेश पवर यांचे पिताश्री बी के पवार यांचा सन्मान केला व वक्ते श्री. रूपेश पवार यांचा सत्कार कवी श्री.जयंत भावे यांनी केला. वक्ते व श्रोतृवर्गाचे मन:पूर्वक आभार श्री.भागोजी गवळी साहेब यांनी मानले. यावेळी सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरलेले होते. अत्यंत बहारदार असा श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला.
चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट
9930862165