सोलापूर जिल्ह्यात 330 हून अधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचार

0

सोलापूर – आपली नाहक बदनामी होणार नाही याची खबरदारी बहुतांश स्त्रीया घेतात मात्र, या नाहक बदनामीला घाबरल्याने अनेक गैरकृत्य करणाऱ्यांची मजल वाढतच जाते. देशात किंवा राज्यात मोठी घटना घडल्यानंतर विविध प्रकारची लैगिंक अत्याचाराची प्रकरणे तेवढयाच ताकदीने पुढे येतात. प्रेमाचे, विवाहाचे आमिष दाखवून अजाणत्या वयात अल्पवयीन मुलींना फसवणूक तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील साडेसात महिन्यात ११७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर ९० अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे आता समोर आले आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी ही आकडेवारी तातडीने पोलिस महासंचालक कार्यालयास पाठविली आहे. मागच्या वर्षी ग्रामीणमध्ये १७९ अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर शहरात अंदाजे ५० मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.

सोलापूर शहरात जानेवारी ते २० ऑगस्ट या काळात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे २७ तर विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ग्रामीणमध्ये ९० अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर ५७ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांमधील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांची माहिती मागविली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech