नाशिक – सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी अडवून मराठा समाजाला 50 टक्के च्या ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मी सर्व खासदारांना याबाबतची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांची व पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करेल अशी आश्वासन दिले आहे.
नाशिक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रावसाहेब थोरात सभागृह येथील कार्यक्रमाला जात असताना रस्त्यातच त्यांचा गाड्या अडवून उभे करून मराठा समाजाला 50 टक्के च्या आत आरक्षण मिळावे तसेच सगे सोयरे कायद्याचे अंमलबजावणी करून तात्काळ त्याबाबत घोषणा करावी यासाठी आपले व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा मराठा समाजाला आता कुठल्याही राजकीय पक्षाने आश्वासन देण्याचा प्रयत्न करू नये जी काही भूमिका असेल ती स्पष्टपणे समाजाला सांगा राकपा पक्षाला लोकसभेमध्ये मराठा समाजाने भरभरून मत दिली .
राष्ट्रवादीचे खासदार निवडून आणले त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपण मराठा समाजाच्या न्यायिक मागणीला पाठिंबा नव्हे तर त्याबाबत आवाज उठवून सत्ताधारी पक्षाला जाब विचारावा व आरक्षण देण्यासाठी भाग पाडावे या आशयाचे निवेदन दिले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना सांगितले की, दोन ते तीन दिवसात मी सर्व राज्यातील खासदारांना स्वतः पत्र लिहून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पाच दिवसाच्या आत भेट घेते तसेच राज्य सरकारची भूमिका काय आहे हे बघून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन मराठा आरक्षण 50% च्या द्यावे यासाठी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू व मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू विरोधक म्हणून आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय करण गायकर ,नानासाहेब बच्छाव, नवनाथ शिंदे ,किरण डोके, सुभाष गायकर ,सचिन पवार, योगेश कापसे ,योगेश गांगुर्डे, योगेश पाटील ,संगीता सूर्यवंशी रागिणी आहेर भारत पिंगळे संदीप फडोळ चेतन शेवाळे आदी समाज बांधव उपस्थित होते.