मुंबई – बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी पोलिसांसह राज्य सरकावर आरोप केले होते. आता यानंतर अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. शाळा प्रशासनाने हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठीच आमच्या मुलाला पैसे देऊन ठार मारले, असा आरोप अक्षय शिंदे याच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठीच माझ्या मुलाची हत्या करण्यात आली, असा आरोप अक्षय शिंदेच्या वडीलांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
“मूळ आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर” बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात काही वेळात सुनावणी पार पडणार आहे. अक्षय शिंदेच्या कथित चकमकीला त्याच्या वडिलांकडून हायकोर्टात देण्यात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कथित चकमकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भीती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे.