एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार !

0

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
झालेल्या बैठकीत निर्णय

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव यांच्यासह एमएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएसआरडीसीचे संबंधीत अधिकारी उपस्थितीत

मंत्री अँड आशिष शेलार यांनी रहिवाशांचा विषय बैठकीत मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी अँड आशिष शेलार म्हणाले की, आमचे स्थानिक आमदार कालिदास कोळबंकर यांच्या ही सूचना आणि रहिवाशांच्या शिष्टमंडळाने केलेल्या सूचने नुसार

मुंबई : एल्फिन्स्टन पुलाचे कामात एकुण १९ इमारती बाधित होणार होत्या पण सरकारने नवीन नियोजन केल्याने केवळ २ इमारती बाधित होत आहे. त्यामुळे सरकारचे आभार… आता या पुलाचे काम सुरु होताना स्थानिक नागरिक विरोध करीत आहे की त्यांच्या मनात भिती आहे पुलाचे काम करताना १७ इमारतींना ही धोका निर्माण होईल. त्यामुळे या सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता ३३(९) अंतर्गत एमएमआरडीए नेच करावा, अशी विनंती अँड आशिष शेलार यांनी केली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.

त्यामुळे ज्या दोन इमारतीमधील रहिवाशांची घरे बाधित होणार आहेत, त्यांना कुर्ला येथे घरे अथवा मोबदला देण्या ऐवजी त्याच ठिकाणी पुनर्विकासीत घरे देण्यात यावीत, अशी मागणी अँड शेलार यांनी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हे मान्य करीत दोन इमारती मधील रहिवाशांना कुर्ला येथे संक्रमण शिबीर म्हणून तात्पुरती घरे देण्यात येतील अन्य १७ इमारतीच्या पुनर्विकास करताना बाधित होणाऱ्या दोन इमारतीं मधील रहिवाशांना त्याच ठिकाणीच घरे देण्यात येतील.

सरकार हे मान्य केले असून भाजपा आमदार कालिदास कोळबंकर यांच्यासह आमची भाजपाची भूमिका आहे की, गिरणगावातील मराठी माणसाला त्याच ठिकाणी घरे मिळायला हवीत त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या गिरणगावातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, अशी भावना व्यक्त करीत अँड आशिष शेलार यांनी सरकारचे आभार मानले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech