नाशिक – विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व जागा निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि त्या जागा निवडून येतील यासाठी नियोजन करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे भाजपा प्रभारी बाळासाहेब विखे पाटील यांनी केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये येऊ नये यासाठी काही बाहेरील देशाची शक्ती व विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पण ते अपयशी झाल्याचा खळबळ जनक वक्तव्य देखील त्यांनी केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय विस्तारित कार्यकारिणी बैठक संपन्न झाली.
आपल्या भाषणातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यादा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील भाषणास सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय शक्ती व आपल्या देशातल्या विरोधी पक्ष यांनी संगनमताने मोदी सत्तेवर येणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली परंतु त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. ते पुढे म्हणाले की, आपण 400 जागा निवडून आणायच्या त्याचा प्रचार जनतेमध्ये केला. परंतु या चारशे जागा कशासाठी निवडून आणायच्या या संदर्भात आपण जनतेला सांगायला कमी पडलो. याची संधी साधून विरोधकांनी जनतेमध्ये भ्रमाचे वातावरण तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. आता हे भ्रमाचं वातावरण पुसून काढण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर येऊन पडलेली आहे. त्यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून येत्या विधानसभेत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणायचे काम करायचे आहे.राधाकृष्ण पाटील आपल्या भाषणातून पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार प्रचंड मताने येणार व महाराष्ट्र हे भारतातीलच नवे तर जगातील आर्थिक सत्तेचे केंद्र नावा रूपाला येणार आहे.