छत्रपती संभाजीनगर – काही जण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढत असतात. मात्र भाजप भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतो. 370 जाईल कुणाला वाटत होता का,राम मंदिर होणार अस कुणाला वाटत होतं का? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी विचारला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ठाकरे आणि शरद पवार गटासह काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्याकडे जोडा, असे निर्देशही शाहांनी दिले.
अमित शाह म्हणाले, महाराष्ट्र 2024 चे निवडणूक राज्याचा चेहरा बदलणार आहे. वैचारिक लढाई आहे. कार्यकर्ता म्हणून काम करा. एकदा निवडणूक जिंका 2029 मध्ये पुन्हा 300 पार जाणार आहोत. एक संकल्प घेऊन पुढे या कमी जागा मिळवल्याचे अपयश पुसून टाका. आपल्या आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोहबत की दुकान बोलताना झूठ की दुकान उघडली आहे. राम मंदिर, 370 कलम हटवले हे निर्णय झाले की नाही. जोशमध्ये नाहीतर होश सांभाळून धैर्यपूर्वक निवडणुकीला सामोरे जा, असेही शाहांनी सांगितले.
16 राज्यात भाजपची सत्ता आहे. विरोधकांचे सगळे मिळून जेवढे जागा आलेत, त्यापेक्षा जास्त जागा आपल्या आल्या आहेत. 2024 मध्ये भाजपाची बहुमताने सत्ता येईल याचा विश्वास आहे. हिवाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड कायदा मंजूर केला जाणार आहे. आतंकवादी आणि पाकिस्तानकडून हल्ले होत होते. देशाच्या सीमेसोबत छेडछाड केली तर घरात घुसून मार पडणार आहे. नक्षलवादी आणि आतंकवाद शेवटचे घटका मोजत आहेत. भारत देशातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे. निवडणुका खूप महत्वपूर्ण आहेत आज उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईमध्ये पण जायचे आहे.