नवी दिल्ली – बांगलादेश आणि भारत यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. त्यामुळे आमचे लक्ष ईशान्य भारतातील राज्यांच्या विकासावर आहे. हे दक्षिण पूर्व आशिया आणि आशियात ईशान्य भारताचे मह्त्व दर्शवते. आम्ही पूर्वोत्तर भारतातील लोकांच्या आकांक्षा-अपेक्षा धोरण आखणाऱ्यांपर्यंत पोहचवण्यावरही लक्ष केंद्रीत करू. आम्ही बांगलादेशातील परिस्थितीचा भारतावर पडणाऱ्या प्रभावासंदर्भात एक पेपर सादर केलाय. बांगलादेशाशी आमचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. आपल्याला हे विसरून चालणार नाही की, तिथे घडणाऱी कुठलीही घटना ईशान्य भारतावर प्रभाव टाकेल.
बांगलादेश आणि भारत यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असल्यामुळे तिथे घडणाऱ्या कुठल्याही घटनेचे परिणाम ईशान्य भारतात पडतील असे प्रतिपादन सैन्याच्या ईस्टन कमांडचे माजी चीफ लेफ्टनंट जनरल आर.पी. कलिता यांनी केले. सोसायटी टू हार्मोनाईज्ड एस्पिरेशन्स फॉर रिस्पॉन्सिबल एंगेजमेंटच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात सत्तांतर होऊन तिथल्या पंतप्रधान शेख हसिना यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलेय. शेख हसिना यांनी भारतात शरण घेतल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे सल्लागार नियुक्त करण्यात आलेय. यापार्श्वभूमीवर माजी सैन्याधिकारी आर.पी. कलिता यांचे विधान अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.