पुणे : राज्याचे क्रीडा व युवकल्याण आणि अल्पसंख्यांक मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी जाहीर केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्यानंतर सदर जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी आता राज्याचे क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवली आहे.ना मदार भरणे हे अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. शासनाकडून त्यांच्यावर पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आल्याने हा विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.