भारत सरकारच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालक पदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती

0

मुंबई – स्वदेशी बनवाटीची हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (तेजस) निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या भारत सरकारच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालक पदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लढाऊ विमान विभागाच्या कार्यक्रम संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लढाऊ विमानांची निर्मिती करण्यामध्ये जाधव यांनी आजवर महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. स्वदेशी बनावटीचे हलक्या तेजस एमके – १ या विमानाच्या उत्पादनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असून या प्रकल्पाचे संचाकल म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

एडीए ही एक स्वायत्त संस्था असून भारताच्या संरक्षण मंत्रालयाने १९८४ रोजी याची स्थापना केली होती. हलक्या वजनाची लढाऊ विमाने तयार करणे आणि त्यात विकास करत जाण्यासाठी याची निर्मिती झाली होती. तेजस लढाऊ विमानाचा विकास केल्यानंतर आता एडीएकडून नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे तेजस एमके- २ हे लढाऊ विमान विकसित करीत आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रासाठी उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. हवेतून इंधन भरण्याच्या व्यवस्थेमुळे ते तीन हजार किलोमीटर पर्यंतचा पल्ला गाठू शकते. जितेंद्र जाधव यांनी ११ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला असून ॲडव्हान्स मिडियम कोम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पाला गती देणे आणि २०२५ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत एमके-२ लढाऊ विमान तयार करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech