मुंबईत शिंदे-ठाकरे गटांमध्ये वाद, पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल

0

मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे कार्यकर्ते महिलांना काही वस्तू आणि आर्थिक मदत वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जाब विचारायला गेले असता, परिस्थिती तणावपूर्ण बनली. घटनेत शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले असता तणाव वाढल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप केला आहे की, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यामुळे मातोश्री क्लबच्या परिसरात तणाव वाढला. मुंबईतील जोगेश्वरी भागात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शिंदे आणि ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला.

घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परबही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शिंदे गटावर आरोप केले की, मुंबईत ठिकठिकाणी शिंदे गटाकडून वस्तू आणि पैसे वाटप केले जात आहे आणि याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला कळवले आहे. घटनेच्या वेळी जोगेश्वरी पूर्वचे ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर उपस्थित होते. त्यामुळे वातावरण आणखी गरम झाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप केला की, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण झाली असून पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी. दुसरीकडे, शिंदे गटाच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर प्रत्यारोप करताना म्हणाल्या की, मातोश्री क्लबबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या महिलांना मारहाण केली, तसेच महिलांवर हात उचलल्याचा आरोपही केला.पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech