सर्वच आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येईल, ठाकरे-पवारांना न्याय नाहीच!

0

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूका लागल्या आणि आता राज्यात नव्याने सरकार स्थापण होण्याच्या मार्गावर असतांना मात्र, ठाकरे आणि पवारांना न्यायालयातून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नसल्याने लवकरच सर्वच आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांच्या सुनावणीवर आतापर्यंत फक्त तारखांवर तारखा मिळाल्या होत्या. मात्र त्यावर ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकाकर्त्यांना कोणताही ठोस निर्णय अद्याप मिळालेला नाही. दरम्यान आता राज्य विधासनभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाला फक्त अकॅडमिक महत्त्व उरणार आहे. सुनावणीत काहीही झाले तरी कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत. कारण सर्वच आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. फक्त तारखांवर तारखा पडत गेल्या. दरम्यान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपला. आता या प्रकरणाची सुनावणी नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना स्वत: करतात की हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech