बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा, पाकिस्तान क्रिकेटला धक्का!

0

लाहोर – पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. देशाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अंतर्गत वाद उफाळल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबरला पुन्हा संघाचं नेतृत्व सोपवलं गेलं होतं, मात्र त्याच्या राजीनाम्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी-२० विश्वचषकाच्या काही काळ आधीच बाबरने हा निर्णय घेतला आहे. याआधी देखील बाबरने कर्णधारपद सोडले होते. मात्र त्याच्याकडे पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आली होती. पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकात खराब प्रदर्शन केल्यानंतर, शाहीन शाह आफ्रिदीला टी-२० संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. परंतु त्याच्या नेतृत्वात संघाने न्यूझीलंडमध्ये निराशाजनक कामगिरी केली.

त्यामुळे बाबरला पुन्हा कर्णधारपद दिलं गेलं होतं. परंतु टी-२० विश्वचषकाच्या तयारीतही संघाचं प्रदर्शन विशेष ठरलं नाही. खराब फॉर्म आणि वाढत्या टीकेमुळे बाबर आझमवर मोठा दबाव होता. या परिस्थितीमुळे त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरने सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याची घोषणा करत म्हटले की, संघाचं नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाचं होतं, परंतु आता माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कर्णधारपदामुळे कामाचा ताण वाढला होता आणि मला फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. माझ्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे बाबरने आपल्या चाहत्यांचे आभार मानत त्यांचा सततचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. २०१९ ते २०२४ या काळात बाबरने २० कसोटी, ४३ एक दिवसीय आणि ८५ टी-२० सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान २०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र तिथे इंग्लंडने त्यांना पराभूत केले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech