अमरावती – राहूल गांधी विरोधात बेताल वक्तत्व केल्यानंतर खा. बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सीपी रेड्डींच्या दालनात ठिय्या दिला होता. याबाबत बळवंत वानखडे, यशोमती ठाकूरसह काँग्रेसच्या ४० पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.राहुल गांधीची जिभ छाटण्याची भाषा योग्य नाही. पण, त्यांनी संविधानाविरोधात केलेल्या चुकीच्या भाष्याबद्दल त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे, असे स्टेटमेन्ट खा. बोंडेंनी ऑनकॅमेरा केल्याने आधी यशोमती ठाकूर विरूध्द अनिल बोंडे असा सामना रंगला होता. नंतर हा वाद भाजप विरूध्द काँग्रेस असा झाला बोंडे वारंवार दंगा भडकविण्याच्या उद्देश्याने भाष्य करतात. तरी देखील पोलिस त्यांच्यावर सुमोटे अॅक्शन घेत नाही, असा रोष व्यक्त करून आ. यशोमती ठाकूर ह्या खा. बळवंत वानखडे, माजी आमदार सुनील देशमुख, प्रा. विरेंन्द्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आदि अनेकांसह सीपींच्या दालनात प्रवेश केला आणि बोंडेंवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणी केली.जो पर्यंत बोंडेंना अटक होत नाही तो पर्यंत दालनातून हटणार नाही, असा पवित्रा यशोमतींनी घेतल्यानंतर सीपींच्या दालनात चांगलेच वातावरण तापले होते. पोलिसांनी बोंडेंवर गुन्हे दाखल केल्यानंतर काँग्रेसने सीपींच्या दालनातील ठिय्या मागे घेतला. त्यानंतर शहर पोलिसांनी फिर्याद देऊन खा.बळवंत वानखडे, आ.यशोमती ठाकूरसह वरील नमूद काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदीचे उल्लघंन व विना परवानगीने आंदोलन केल्याचे फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.